Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्याने चढ-उतार होत असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर उतरताना दिसत आहेत, मात्र, आज (बुधवारी) सोन्याच्या भावात (Gold Price Today) किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सलग उतरणारे सोन्याचे दर आता वधारले आहेत. आज सोन्याची किंमत 0.38 टक्क्यांनी वाढून 47,616 रुपये प्रति तोळावर पोहचली आहे. तर, चांदीच्या किंमतीतही वाढ होऊन सध्या चांदीचा भाव 62,777 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

 

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्या-चांदीचा भाव वधारलेला आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात साधारण वाढ होत आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत सोनं यंदा स्वस्त आहे. कारण गेल्या वर्षी सोन्याचा दर 50 हजार पार होता. तोच दर सध्या 48 हजाराच्या आत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. (Gold Price Today)

दरम्यान, जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.
‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care App) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही फक्त सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रारही करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

 

मिस्ड कॉलद्वारे तपासा सोन्याची किंमत –
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल
आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. (Gold Price Today)

 

Web Title :- Gold Price Today | gold silver price today in india 24 november check 10 gram gold rate marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Pune Crime | गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल व अमित गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, बनावट खरेदी खताद्वारे SRA प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न