Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | मागील दोन ते तीन महिन्यापासून सोन्याच्या किंमती (Gold Price) घटताना पाहायला मिळाल्या आहेत. यामुळे ग्राहकाने खुशीने सोन्याची खरेदी करताना बाजारात गर्दी केल्याचे दिसले. मात्र, आता दोन महिन्याच्या दैनंदिन घसरणींनंतर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेली दोन, तीन दिवस झाले सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ होत आहे. आज सोन्याच्या दरात किंचित अशी वाढ झाली आहे. साधारण 10 रुपयांची वाढ झाली आहे. याचप्रमाणे चांदीच्या दरात (Silver Price) देखील 10 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Price Today | gold silver price today mcx mumbai pune gold rate and silver rate hike by rs 10

सोन्याच्या दरात गुरुवारी (29 जुलै) 230 रुपयांची वाढ झाली होती. तत्पूर्वी बुधवारी (28 जुलै) सोन्याच्या भावात (Gold Price)180 रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान मागील दहा दिवसामध्ये सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण पाहायला मिळाली. नंतर आता सोन्याच्या दरात मागील दोन ते तीन दिवसापासून किरकोळ वाढ होताना दिसत आहे. तर, गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा उच्च आकड्यावर पोहचला होता. त्यात साधारण 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीच्या दरात (Silver Price) गुरुवारी (29 जुलै) त्यात 700 रुपयांची घसरण झाली होती. तत्पूर्वी बुधवारी (28 जुलै) 400 रुपयांची घसरण झाली होती. मागील महिन्यापासून चांदीच्या दरात वारंवार चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात, 1 जून रोजी चांदीचा भाव ही 72,600 रुपये इतका होता. नंतर त्या दरात घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यातील गुंतवणूक कमी झालीय. तर, डॉलरच्या दराच्या
बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला आहे. म्हणून, सोन्याच्या दरात
(Gold Price) वारंवार घट होताना दिसते. मागील एक दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण
झाल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र, पुढील काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणून सध्या सोन्याचा दर आटोक्यात आहे. म्हणून त्यात गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचांदीचे दर –

24 कॅरेट (एक तोळा) सोन्याचा दर : 48,080 रुपये

22 कॅरेट (एक तोळा) सोन्याचा दर : 47,080 रुपये

1 किलो प्रमाणे चांदीची किंमत : 67,210 रुपये

हे देखील वाचा

Tokyo Olympics | बॉक्सिंगमधून भारतीयांना खुशखबर ! लोव्हलिना बोगोर्हेनने केले पदक निश्चित

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Today | gold silver price today mcx mumbai pune gold rate and silver rate hike by rs 10

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update