Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण ! जाणून घ्या आज दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या चांदीच्या वायदे बाजारातील किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी डिसेंबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 266 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,386 रुपयांवर आला. याशिवाय बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वायदा बाजारात सोन्याचा भाव 231 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,450 रुपये होता. तसंच बुधवारी सकाळी जागतिक वायदा आणि सोन्याच्या स्पॉट किमतीत घसरण दिसून आली.

दुसरीकडे स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सकाळी चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजच्या डिसेंबर वायदा बाजारात चांदीचा भाव बुधवारी सकाळी 9 वाजून 53 मिनिटांवर 1396 रुपयांची घट होऊन प्रतिकिलो 61,070 रुपये ट्रेंड करत होता. तसचं जागतिक पातळीवर चांदीच्या वायदा आणि स्पॉटच्या किंमतीतसुद्धा घसरण दिसून आली.

जागतिक बाजारात सोन्याचे दर

जागतिक पातळीवर सोन्याचे वायदे आणि स्पॉट दोन्हीही किमतीत घसरण झाली. ब्लूमबर्गच्या मते बुधवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायदा बाजारातील दर 0.36 टक्क्यांनी म्हणजे 6.90 डॉलरने घसरून 1896.30 डॉलर प्रति औंस झाले. याशिवाय सोन्याचा जागतिक स्पॉट किंमतीत सध्या 0.40 टक्के म्हणजेच 6.90 डॉलरची घट होऊन 1896.30 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करताना दिसला.

जागतिक बाजारात चांदीचे दर

ब्लूमबर्गच्या मते, बुधवारी सकाळी कॉमेक्सवरील चांदीचा जागतिक वायदा भाव 1.90 टक्क्यांनी म्हणजेच 0.46 डॉलर खाली घसरून 23.98 डॉलर प्रति औंस झाला. त्याचसोबत चांदीच्या जागतिक स्पॉट बाजारातील किंमत 23.91 डॉलर प्रतिऔंस ट्रेंड होत आहे.