Gold Price Today | आजही सोन्याच्या दरात घसरण पण चांदी ‘जैसे-थै’, जाणून घ्या नवीन दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सोन्याच्या दरात (Gold Price Today) घट झाल्याचं दिसत आहे. याचप्रमाणे आज देखील सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहे. आज (बुधवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 रुपये आहे. तर, चांदी 61,900 रुपये प्रति किलोपर्यंत स्थिर आहे.

 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price) उतरताना दिसत आहे. मागील दोन महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोनं स्वस्त झालं आहे. लग्न सराईत देखील सोन्याच्या किंमती कमी असल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफा बाजारात गर्दी दिसत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी योग्य संधी आहे. (Gold Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400 रुपये

 

मुंबई
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,400 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,900 रुपये (प्रति किलो).

 

Web Title :- Gold Price Today | gold silver rate in india today on 22 december 2021 Marathi News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ration Card Update | तुमचा सुद्धा झाला असेल विवाह तर रेशन कार्ड करा अपडेट, अन्यथा मिळणार नाहीत अनेक विशेष सुविधा; जाणून घ्या प्रक्रिया

Viral Video | परीक्षेत करत होता कॉपी, डोक्यावर होता विग; कानात लपवले होते ईयरफोन (व्हिडीओ)

Rakhi Sawant | राखी सावंतचा पती रितेशचं पहिल्या पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण, म्हणाला – ‘लग्न नाकारत नाही पण…’

Poonam Pandey | पूनम पांडे अतिटाईट कपडे घालून पोहोचली मुंबई एअरपोर्टवर, कॅमेर्‍याची लाईट पडताच लोकांना वाटली लाज