Gold Price Today | दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांमध्ये मोठा उत्साह, जाणून घ्या आजचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | मागील दोन ते तीन आठवड्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ग्राहकाच्यांत सोनं खरेदी करण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झाली होती. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Price Today) घट होत होत्या. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी सोन्याच्या मागणीत वाढ झाली. गेल्या दोन दिवसामध्ये सोन्याचे दर तब्बल 900 रुपयांनी वधारले. आज (शुक्रवारी) सोन्याची किंमत (Gold Price) 48,800 रुपये आहे. दसरा कालावधीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घट (Gold Price Today) होताना दिसत आहे. तेव्हापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून मागणी वाढत असल्याने पुन्हा सोन्याच्या दरात झळाळी दिसून आली. त्यामुळे सोन्याचे दर वधारले. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत Silver Price) देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर सध्या चांदीचा भाव 64 हजारांवर पोहचला आहे.

सोने आणि चांदीच्या दरात 8 ऑक्टोबरपासून वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 47,800 रुपयांवर असणारी सोन्याची किंमत सध्या 48,800 रुपयांवर ट्रेड करत आहे. 8 ऑक्टोबरपासून सोन्याच्या भावात जवळपास 900 ते 1000 रुपयाची वाढ झाली आहे. याचबरोबर चांदीच्या दरात देखील वाढ दिसून आली आहे. 62,500 रुपयांवर असणारी चांदी सध्या 64,200 रुपये प्रतिकिलोवर पोहचली आहे.

दरम्यान नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
मुहुर्तावर सोनं खरेदी करण्याचा कल अधिक वाढताना दिसत आहे.
मात्र, नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price) वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
तरही सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
सोनं खरेदी करण्यासाठी एकप्रकारे ग्राहकांची झुंबड उठली आहे.
दरम्यान, सोने-चांदी खरेदी वाढली असून, असाच कल दिवाळी सनापर्यत राहील असं व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | Great excitement among consumers to buy gold on the auspicious occasion of Dussehra, find out today’s rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update