Gold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) बुधवारी सुद्धा तेजी दिसून आली. एमसीएक्स (MCX) वर सोने वायदा हलक्या वाढीसह ट्रेड करत आहे, परंतु सोन्याचा भाव अजूनही 2 महिन्याच्या खालच्या स्तरावर आहे. आज सोने 47,000 प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदी 0.46 टक्के वाढीसह 67823 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात तेजीने वाढ न करण्याबाबतचे वक्तव्य केल्यानंतर पॉझिटिव्ह ग्लोबल संकेतांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बुधवारी तेजी आली आहे.

मागच्या आठवड्यात जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात चढ-उतार आला आहे. इंटरनॅशनल मार्केटबाबत बोलायचे तर येथे हाजिर सोने 0.1 टक्केच्या वाढीसह 1780.06 डॉलर प्रति औंसवर आहे. रॉयटर्सनुसार, अमेरिकन सोने वायदा 1,777.60 डॉलर प्रति औंसवर स्थिर होते.

24 कॅरेट सोन्याचा दर

गुड रिटर्न वेबसाईटनुसार, 23 जून 2021 ला 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्व शहरांमध्ये वेगवेगळा आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50350 रुपये, चेन्नईत 48600 रुपये, मुंबईत 47110 रुपये, कोलकातामध्ये 48980 रुपये, बेंगलोरमध्ये 48110 रुपये आहे.

IBJA चे दर

बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड म्हणजे आयबीजेए दर प्रति ग्रॅमवर विना GST पुढील प्रमाणे…

– 999 (शुद्धता)- 47,312
– 995- 47,123
– 916- 43,338
– 750- 35,484
– 585- 27,678
– चांदी 999- 68,198

हे देखील वाचा

राजकीय दबावातून वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

Sanjay Raut | ‘त्या’ महिलेच्या तक्रारीची हायकोर्टाकडून दखल; संजय राऊतांच्या अडचणीत वाढ

LPG Connection | मोठी खुशखबर ! सरकार देणार फ्री गॅस कनेक्शन, जाणून घ्या कसा करावा लागेल अर्ज?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : gold price today high on 23 june 2021 and silver rates edge higher check latest price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update