×
Homeआर्थिकGold Price Today MCX | सोने खरेदी करणे झाले महाग, चांदीत झाली...

Gold Price Today MCX | सोने खरेदी करणे झाले महाग, चांदीत झाली घसरण; जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today MCX | लग्नसराईने सोन्याची चमक पुन्हा एकदा वाढवली आहे. सध्या सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. सोने-चांदी (Gold silver price) ची मागणी वेगाने वाढत आहे. अशावेळी आज सोन्याच्या किमतीत (Gold price today) किरकोळ वाढ दिसून येत आहे. तर, चांदी स्वस्त झाली आहे. आज बुधवारी 5 जानेवारीला मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यात फेब्रुवारी वायदामध्ये 0.10 टक्के वाढ दिसत आहे. तर चांदीच्या दरात 0.14 टक्के घसरण झाली आहे. (Gold Price Today MCX)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today) :

आजच्या व्यवहारात फेब्रुवारी वायदा सोन्याची किंमत 0.10 टक्के वाढीसह 47,995 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. काल सुद्धा सोन्याच्या दरात तेजी नोंदली गेली होती.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today) :

चांदीच्या दरात आज 0.14 टक्के घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,141 रुपये किलोवर आहे.

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today MCX | gold-price-today-05-january-2022-continue-to-rise-for-5th-consecutive-days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

 

Cryptocurrency Prices Today | मागील 24 तासात तीन क्रिप्टोकरन्सीजमध्ये झाली 500% वाढ, बिटकॉईन स्टेबल

Must Read
Related News