Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीही महागली, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. भारतीय सराफ बाजारात सोमवारी (दि. 24) सोन्याच्या भावात 95 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 48, 000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. गेल्या सत्रात सोन्याचा भाव 47,920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 48,015 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीच्या दरात 154 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा दर 70,998 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. यापूर्वीच्या सत्रात चांदीचा दर 70,844 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दरात वाढ झाली, तर चांदीच्या किंमती स्थिर होता.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 आठवड्यापासून सोन्याच्या दरात तेजी आहे. सद्य परिस्थितीत गुंतवणुकदारांच्या खरेदीमुळे दर तेजीत आहे. तसेच सोन सध्या डॉलरच्या कमजोरीमुळे, 4 महिन्यांच्या उच्चांकी दरावर आहे. मोतीलाल ओसवाल फायनेंशियल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी, कमकुवत डॉलर आणि अमेरिकी बॉन्डमध्ये आलेल्या कमीमुळे गुंतवणुकदार सोने खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचे सांगितले.