Gold Price Today : खुशखबर ! सलग दुसर्‍या दिवशी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दर देखील घसरले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सलग दुस-या दिवशी सराफा बाजात सोन्या- चांदीचे दर पुन्हा एकदा कमी झाले आहेत. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत रेकॉर्ड स्तरावरील 56 हजार 200 रुपयांवरून 50,584 रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. यानुसार एका महिन्यात सोन्याच्या दरात 5 हजार 616 रुपये प्रति तोळाची घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच ऑगस्टमध्ये चांदीचे दर 80 हजार 000 रुपये प्रति किलो होते. जे आज कमी होऊन 61 हजार 250 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. चांदीच्या किंमतीमध्ये 18 हजार 118 रुपयांची घसरण झाली आहे.

विदेशी बाजारात किंमत कमी झाल्याने देशांतर्गत बाजारात देखील मंगळवारी सोने आणि चांदीच्या किेंमतीत घसरण झाली. कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर डिसेंबरच्या डिलिव्हरीे सोने 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 50,584 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदीची वायदे किंमत 0.35 टक्केने कमी होत 61,882 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे.

कशामुळे झाले सोने स्वस्त 

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये झालेली रिकव्हरी आणि अमेरिकन आर्थिक पॅकेजमधील अस्थिरता यामुळे सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्ड 0.1 टक्कयाने घसरून 1,898.16 डॉलर प्रति औंस झाले आहे. चांदीची किंमत 0.3 टक्क्याने कमी होत 24.43 डॉलर प्रति औंस झाली आहे. प्लॅटिनम आणि पलेडियम 0.1% ने वाढून 857.85 डॉलर प्रति डॉलर वर पोहोचले आहेत.

दिवाळीनंतर दर वाढण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढू शकतात. डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर सर्वाधिक स्तरावर पोहचू शकतात. सोन्यात दर 500 ते 600 रुपयांच्या घसरणीवर गुंतवणूक केली जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर सोन्याचे दर 52500 ते 53000 होऊ शकतात.