Gold Price Today । सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver price today । बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver price today) सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या काही दिवसापासून सोन्याची किंमत ‘जैसे थे’ आहे. मात्र चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ दिसून आलीय. आजची सोने आणि चांदीचा दर वाढलेला पाहायला मिळत आहे. एमसीएक्सनुसार (MCX) सोन्याचा भाव 0.3 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच चांदीचा भाव देखील 0.3 टक्क्यानी वाढला आहे. आज सोन्याचा भाव 47,445 रुपये प्रति तोळा आहे आणि चांदीचा भाव 70254 रुपये प्रति किलो वर पोहचला आहे. सोन्यात सध्या वाढ झाली असली तरी आज सर्वोच्च स्तरापेक्षा सोन्याचा भाव (gold price ) 9 हजार रुपयांनी कमीच आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचा भाव (gold price ) सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. त्यावेळी सोन्याची किंमत(gold price )56,200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होता. आजपर्यंत सोने आणखी या रेकॉर्ड पोहोचलं नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्यात तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेत सोन्याची किंमत 7.33 डॉलरच्या तेजीनंतर 1,798.73 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीचा भाव 0.14 डॉलरच्या तेजीमुळे 26.57 डॉलरच्या स्तरावर पोहोचले आहेत.

24 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति तोळा ) –

दिल्ली 24 कॅरेट – 50,510 रुपये

मुंबई 24 कॅरेट – 47440 रुपये

चेन्नई 24 कॅरेट – 48980 रुपये

कोलकाता 24 कॅरेट – 49620 रुपये

बंगळुरू 24 कॅरेट – 48480 रुपये.

या दरम्यान, HDFC Securities चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमध्ये आलेल्या कमजोरीमुळे गुंकवणूकदारांनी सोनंखरेदी केली आहे. म्हणून सोन्याचा दराला पाठींबा मिळाला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांनी सांगितलं की, डॉलरमध्ये घसरण आणि कोव्हिड-19 च्या नवीन व्हॅरिएंटबाबत वाढलेल्या भीतीमुळे सोन्याच्या दरात वाद होत आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ‘या वर्षाच्या शेवटी सोन्याचा भाव सर्व रेकॉर्ड तोडून साठ हजार रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचू शकतात. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी सहा महिन्याच्या अवधीत खरेदी केल्यास त्यांना नफा होऊ शकतो. गतवर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : gold price today | on 6 july 2021 incresead and reach 2 week high but still down 9k from record high, konw todays rates

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा