Gold Price Today | सोने तेजीनंतर सुद्धा मिळत आहे 10 हजार रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅम गोल्डचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरराष्ट्रीय बाजारात मजबुतीमुळे भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 13 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) किंचित वाढ नोंदली गेली. यानंतरही सध्या सोने रेकॉर्ड हायच्या तुलनेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे. तर, चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) सुद्धा तेजीचा कल होता. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 67,498 रुपये प्रति कि.ग्रॅ.वर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

सोन्याचे नवीन दर (Gold Price, 13 July 2021) –
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात अवघ्या 90 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन दर आता 46,856 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज वाढून 1,809 डॉलर प्रति औंसवर पोहचली. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 ला सोन्याची किंमत 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर बंद झाली होती. या आधारावर आज सोने रेकॉर्ड हायपासून 10,152 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.

चांदीचे नवीन दर (Silver Price, 13 July 2021) –

चांदीच्या किंमतीत सुद्धा आज तेजीचा कल होता.
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 490 रुपयांनी वाढून 67,988 रुपये प्रति कि.ग्रॅ.वर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात जास्त बदल झाला नाही आणि तो 26.21 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

Web Titel :- gold price today rise but still 10000 rupees cheaper then record high silver price jumped on 13 july 2021

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lightning | वीज कोसळल्याने देशात 78 लोकांचा गेला बळी; पीएम मोदींनी केली आर्थिक मदतीची घोषणा

Smartphone | जर तुमची मुले सुद्धा जास्त मोबाइल पहात असतील तर ‘या’ 6 टिप्सचा करा वापर, जाणून घ्या

Thane Crime News | धक्कादायक ! चक्क रक्ताचा टिळा लावून केला प्रेमाचा बनाव, विवाहित तरूणाचे युवतीवर लैंगिक अत्याचार