Gold Price Today : वायदा बाजारातस्वस्त झालं सोनं अन् चांदीही घसरली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायदा बाजारात गुरुवारीही सोने आणि चांदीच्या भावात घट झाली. एमसीक्सवर ५ ऑक्टोबर २०२० चा डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव सकाळी १०:२१ वाजता ३३७ रुपये म्हणजे ०.६४ टक्क्याने घसरून ५२,२८५ रुपये १० ग्रामवर ट्रेंड करत होता. ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीच्या सोन्याचा बंद भाव बुधवारी ५२,६२२ रुपये प्रति १० ग्राम होता. अशाच प्रकारे, डिसेंबर २०२० च्या डिलिव्हरीचे सोने २४३ रुपये म्हणजे ०.४६ टक्क्याने घसरून ५२,५६० रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होते. डिसेंबरच्या सोन्याचा बंद भाव बुधवारी ५२,८०३ रुपये प्रति १० ग्रामवर होता.

वायदा बाजारात चांदीचा भाव
वायदा बाजारात चांदीच्या भावातही चांगलीच घट झाली आहे. ४ सप्टेंबर २०२० चा डिलिव्हरीच्या चांदीचा भाव सकाळी १०:३३ वाजता ७०३ रुपये म्हणजे १.०३ टक्क्याने घसरून ६७,२६० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता. दुसरीकडे ४ डिसेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव ७२३ रुपये म्हणजे १.०२ टक्क्याने घसरून ७०,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव
ब्लूमबर्गनुसार, जागतिक स्तरावर कॉमेक्सवर डिसेंबर २०२० मध्ये डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव १६.६० डॉलर म्हणजे ०.८४ टक्क्याने घसरून १,९५३.७० डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत आहे. तसेच हाजीर बाजारात सोने १८.४४ डॉलर म्हणजे ०.९६ टक्क्याने वाढले आहे. हाजीर बाजारात सोने १,९४७.४२ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत
जागतिक बाजारात कॉमेक्सवर डिसेंबर २०२० मध्ये डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ०.२१ डॉलर म्हणजे ०.७७ टक्क्याने घसरून २७.२८ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत आहे. तर हाजीर बाजारात चांदी ०.४८ डॉलर म्हणजे १.८१ टक्क्याने वाढून २७.१९ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत आहे.