Gold Price Today : 9000 रुपयांनी स्वस्त झाले सोने, चांदीच्या किमतीत तेजी, चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तेजी नोंदली गेली आहे. एमसीएक्सवर सोन्यात तेजी आहे. आज सोने 0.6 टक्केच्या तेजीसह 47004 प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर, चांदी 0.6 टक्के वाढून 68,789 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. विक्रमी स्तरापासून सोन्याच्या किमतीत 9000 रुपयांची घसरण दिसून आली आहे.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा दर सपाट लेव्हलवर ड्रेड करत आहे. हाजिर सोने 1,770.66 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर चांदी 25.90 डॉलर प्रति औंसवर स्थिर होती.

सोन्याचा भाव –
सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून वायदा सोन्याचा दर 270 रुपयांनी वाढून 47,007 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

चांदीचा भाव –
एमसीएक्सवर वायदा चांदीची किंमत 401 रुपयांनी वाढून 67,925 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. स्पॉट मार्केटमध्ये चांदीची किंमत 25.90 डॉलर प्रति औंस होती.