Gold Price Today : सोन्याचा वायदा भाव घसरला तर चांदी ‘चमकली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशांतर्गत वायदा बाजारात शुक्रवारी सकाळी सोन्याचा भाव घसरला आहे. शुक्रवारी सकाळी ०९:०५ वाजता एमसीक्स एक्सचेंजवर ५ ऑगस्ट २०२० चा सोन्याचा वायदा भाव १७ रुपयाने कमी होऊन ४८,८६१ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. तर ५ ऑक्टोबर २०२० चा सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी ०९:०६ वाजता एमसीक्सवर ३० रुपयाने कमी होऊन ४९,००८ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. विशेष म्हणजे देशांतर्गत सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा हाजीर भाव ५०,१८४ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता.

तसेच चांदीच्या देशांतर्गत वायदा भावात शुक्रवारी सकाळी वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी १०:०५ वाजता एमसीक्सवर ४ सप्टेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव ०.२८ टक्के म्हणजे १४४ रुपयाने वाढून ५१,२३५ रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता. विशेष म्हणजे मागच्या सत्रात गुरुवारी चांदीचा देशांतर्गत हाजीर भाव ५२,९३० रुपये प्रति किलोग्रामवर होता.

काय असतो वायदा बाजार?
सोन्याचा व्यापार दोन प्रकारे होतो. एक हाजीर बाजारात आणि दुसरा वायदा बाजारात. वायदा बाजाराला कमोडिटी एक्सचेंज असेही म्हणतात. वायदा बाजारात डिजिटल पद्धतीने वस्तू विकली जाते व खरेदी केली जाते. वायदा बाजारात वस्तूच्या जुन्या व नव्या किंमतींच्या आधारे भविष्यातील किंमतींवर करार केले जातात. या बाजारात निश्चित तारखेपर्यंत करार असतात. वायदा बाजाराचा थेट परिणाम हाजीर बाजारावर होतो. हाजीर बाजार आणि वायदा बाजारात वस्तूंच्या किंमतीत फारसा फरक नसतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा भाव ०.१६ टक्के म्हणजे २.८० डॉलरने वाढून १,८०६.६० डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. तसेच सोन्याचा जागतिक हाजीर भाव शुक्रवारी सकाळी ०.१२ टक्के म्हणजे २.०८ डॉलरने खाली येत १,८०१.४७ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.

तर शुक्रवारी सकाळी चांदीचा वायदा भाव कॉमेक्सवर ०.४६ टक्के म्हणजे ०.०९ डॉलरने वाढून १९.०५ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. याशिवाय चांदीचा जागतिक हाजीर भाव यावेळी ०.१५ टक्के ०.०३ डॉलरने घसरून १८.६२ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.