Gold Price Update | सोन्याच्या खरेदीसाठी सध्या करू नका घाई, दिवाळीपर्यंत 45000 रुपयांपर्यंत येऊ शकतो भाव, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Update | जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जर तातडीने सोने खरेदी करण्याची गरज नसेल तर तुम्ही आणखी काही दिवस वाट पाहू शकता. जाणकारांनुसार, सोन्याच्या किमतीत येत्या काळात मोठी घसरण होऊ शकते (Gold prices could fall sharply in the future). विचार न करता ताबडतोब सोने खरेदी केल्यास नुकसान होऊ शकते.

सराफा बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या थोडी प्रतिक्षा केली पाहिजे कारण येत्या काळात सोने आणि चांदी आणखी स्वस्त होऊ शकते.
कारण जगभरातील शेयर बाजारांमध्ये खरेदीचा काळ सुरूझाला आहे.
अशावेळी गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडून शेयर बाजाराकडे वाढला आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव घसरून 45000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर येऊ शकतात.
अशावेळी तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक न करता काही दिवस प्रतिक्षा केली तर भविष्यात सोन्यात चांगला नफा होऊ शकतो.

1 ऑक्टोबरपासून सोने-चांदीवर 5 टक्के कमी कस्टम ड्यूटी

इतकेच नव्हे 1 ऑक्टोबरपासून देशात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घट होण्याचा सुद्धा अंदाज आहे.
कारण 1 ऑक्टोबरपासून सोने-चांदीवरील आयात शुक्ल (Import Tax) 5 टक्के कमी होणार आहे.

इतके स्वत मिळेल सोने

5 टक्के कस्टम ड्यूटी कमी झाल्यास सोन्याचा भाव 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असेल तर ग्राहकांला 2500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त सोने मिळेल.
2019 मध्ये मोदी सरकारने 10 टक्के कस्टम ड्यूटी वाढवली होती.

 

गुंतवणुकदारांना केले सावध, होऊ शकते मोठी घसरण

अमेरिकन संस्था यूबीएस ग्रुप (UBS Group) ने सोन्याच्या ग्राहकांना सध्या खरेदी करण्यापासून सावध केले आहे.
यूबीएस ग्रुपने सोने गुंतवणुकदारांना सावध करत म्हटले आहे की, येत्या काळात सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली जाऊ शकते.
त्यांचे म्हणणे आहे की कोरोनानंतर आर्थिक सुधारणा वेग घेऊ शकतात.

तर गुंतवणुकीतून बाहेर पडा

अमेरिकन जॉब मार्केटचा डेटा अपेक्षेपेक्षा चांगला आला आहे.
अशावेळी फेडरल रिझर्व्ह वेळेपूर्वी व्याजात वाढीचा निर्णय घेऊ शकते.
यूबीएस ग्रुपच्या कमोडिटी मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही टॅक्टिकल पोझिशनमध्ये असाल तर या गुंतवणुकीतून बाहेर पडा. यूबीएस ग्रुपच्या अंदाजानुसार इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोने 1600 डॉलर आणि चांदी 22 डॉलरच्या स्तरावर घसररू शकते.

सोन्यात मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक योग्य

अजय केडिया यांनी म्हटले की, सोन्यात दिर्घ कालावधीसाठी गुंतवणूक योग्य ठरते.
कारण यामुळे सोन्याच्या दरावर होणार्‍या चढ-उताराचा परिणाम होणार नाही आणि तुम्हाला योग्य रिटर्न मिळेल.
सोन्यात किमान 3 ते 5 वर्षासाठी गुंतवणूक करणे योग्य ठरेल.

 

Web Title : Gold Price Update | don not rush buy gold now prices may fall rs 45000 diwali know reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP MLA Rahul Kul | भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

Female Teachers | शिक्षण विभागाच्या मुख्यालयाबाहेर 5 महिला शिक्षकांनी प्यायले विष, जाणून घ्या पूर्ण प्रकरण; पहा Video

Modi Government | 12 कोटी लोकांवर मोदी सरकार होणार मेहरबान, वार्षिक मिळतील 12000 रुपये; जाणून घ्या