Gold Price Update | कोविडच्या नवीन व्हेरिएंटमुळे सोन्याच्या किमतीत उसळी, Gold खरेदी करणे महाग ठरू शकते का?

0
150
Gold Price Update | gold price rises due to new covid variant should buy gold rate in sarafa bazar
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | कोविडच्या नवीन व्हेरिएंटमुळे (New Covid variant) जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये हाहाकार उडाला असताना सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी संपलेल्या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange- MCX) वर सोन्याच्या वायदा किमतीत 219 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ दिसून आली. डिसेंबर वायदा सोन्याचा दर 47,640 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. (Gold Price Update)

 

जाणकार सांगतात की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे इक्विटी मार्केटमध्ये विक्रीचे सत्र सुरू आहे तर सोन्यात खरेदी वाढत आहे. गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे वाढत आहे, यासाठी सोन्याच्या किमती वाढत आहेत. सोन्याच्या किमतीमधील तेजीला कोविडच्या व्हेरिएंटला जबाबदार ठरवता येऊ शकते.

 

याशिवाय अमेरिकन डॉलर (US Dollar) च्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे सुद्धा सोन्याची चमक वाढली आहे. मार्केट एक्सपर्ट सोने गुंतवणुकदारांना छोट्या कालावधीत जास्त नफा कमावण्यासाठी यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.

 

मार्केट एक्सपर्ट सांगतात की, सोन्याच्या किमतीत शॉर्ट टर्ममध्ये तेजी दिसून येईल. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 46,900 रुपये प्रति 10 लेव्हलवर स्टॉप लॉस कायम ठेवत 48,700 रुपयांच्या शॉर्ट टर्म टार्गेटसाठी जवळपास 47,500 रुपयांपासून 47,700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर सोने खरेदी करू शकता. एका महिन्यात, आपण पाहू शकतो की, सोन्याच्या किमतीत 49,700 रुपयांचा स्तर गाठू शकतात. (Gold Price Update)

2022 च्या अखेरपर्यंत सोन्याचा दर 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यत जाऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने पुढील वर्षी 2022 च्या अखेरपर्यंत 2,000 डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकते.

 

काय सोन्याचा दर
दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 4,721 रुपये प्रति ग्रॅम नोंदला गेला.
24 कॅरेट सोन्याचा दर 5,150 रुपये प्रति ग्रॅम होता. 1 ऑक्टोबरला 22 कॅरेट सोन्याचा दर 45,550 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
दोन महिन्याच्या आत सोन्याने प्रति 10 ग्रॅमवर सुमारे दोन हजार रुपये रिटर्न दिला आहे.

 

Web Title :- Gold Price Update | gold price rises due to new covid variant should buy gold rate in sarafa bazar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Ahmednagar | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Nawab Malik | ‘पब, पार्टी आणि पेंग्विनमुळे महाराष्ट्राची बदनामी’ ! आशिष शेलारांच्या टीकेला नवाब मलिकांचे जोरदार प्रत्युत्तर; दिला ‘हा’ इशारा

Sanjay Raut | संगीत सोहळयात वधूपिता संजय राऊतांचा सुप्रिय सुळेंसोबत ‘डान्स’, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)