Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहक संभ्रमात, आता 27691 रुपयांत मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Update | सणासुदीच्या या काळात जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी (12 October) सोन्यासह चांदीच्या किमतीत तेजी नोंदली गेली (Gold Price Update) आहे.

मंगळवारी सोने 233 रुपये महाग होऊन 47335 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले.
यापूर्वी सोमवारी सोने 47102 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.
मंगळवारी चांदी 148 रुपये महाग होऊन 61638 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली.
सोमवारी चांदी 61490 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली होती. (Gold Price Update)

सोने 8865 आणि चांदी 18352 रुपयांनी स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 8865 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता.
त्यावेळी सोने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. यापूर्वी स्थानिक बाजारात सोने घसरून 45 हजार रुपयांपेक्षा खाली गेले होते.
तर यावर्षी 1 जानेवारीला सोने 50,300 रुपयांवर होते. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 18352 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत होती.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

अशाप्रकारे मंगळवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा ताजा दर 47335 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47415 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43259 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35501 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27691 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

Web Title : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 13th october know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या नेमकं काय झालं?

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी