Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदार खुश ! आता 27501 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम Gold, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | आजपासून नवीन व्यवहाराच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून (Gold Price Update) आली होती. मागील आठवड्यात सोने 557 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त स्वस्त झाले होते. तर चांदी सुमारे 1100 रुपये प्रति किलोपर्यंत स्वस्त झाली.

सोने 9200 रुपयांनी स्वस्त
या घसरणीनंतर सोने सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9200 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16628 रुपये प्रति किलोच्या दरापेक्षा स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

सोन्यात आणखी घसरण होऊ शकते
शुक्रवारी गणेश चतुर्थीनिमित्त कमोडिटी बाजार बंद होता.
तर इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुटीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचे दर जारी करत नाही.
जाणकारांनुसार, आगामी दिवसात सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होऊ शकते.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर
गुरुवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47016 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46030 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43061 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35258 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27501 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

Web Titel :- Gold Price Update | gold silver jewelry price rate update 13th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20-ODI Captaincy | T20 विश्वचषकानंतर विराट कोहली सोडणार कर्णधारपद, रोहित शर्मा सांभाळणार भारतीय संघाची सूत्रे – रिपोर्ट

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या

Gangajal | ‘कोरोना’च्या उपचारात परिणामकारक ठरू शकते ‘गंगाजल’, काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) तज्ज्ञांनी केला दावा