Gold Price Update | लागोपाठ चौथ्या दिवशी स्वस्त झाले सोने, आता 27532 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Gold Price Update | सोने खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात पहिल्या दिवशी सुद्धा सोने आणि चांदीमध्ये घसरण नोंदली गेली होती. हा लागोपाठ चौथा दिवस आहे जेव्हा सोन्यासह (Gold Price Update) चांदीच्या किमतीत घसरण नोंदली गेली आहे. सोमवारी सोने 96 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त होऊन 47063 वर बंद झाले. यापूर्वी मागील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी गुरुवारी सोने 47159 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

सोमवारी चांदीच्या दरात 1011 रुपये प्रति किलो मोठी घसरण नोंदली गेली.
या घसरणीनंतर चांदी 63056 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली.
यापूर्वी गुरुवारी चांदी 64067 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली होती.

सोने 9137 आणि चांदी 16924 रुपये स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9137 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने आपाला सर्वोच्च स्तर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16924 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

सोमवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47063 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46875 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43110 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35297 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27532 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

Web Title : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 14th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Beed Accident News | बीड-परळी मार्गावर 2 जीपची समोरासमोर धडक; दीर-भावजय जागीच ठार

KBC | केबीसीच्या सेटवर पुण्याच्या दीप्ती तुपे समोर BIG B नं केला पहिल्या प्रेमाचा उल्लेख (व्हिडिओ)

RBI नं दिल्या सर्व बँक ग्राहकांना ‘या’ महत्वाच्या सूचना !