Gold Price Update | सोने खरेदीदार खुश ! आता 27644 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम सोने, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी (15 September) सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ नोंदली गेली. बुधवारी सोन्याच्या किमतीत 238 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीनंतर सोने 47255 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. यापूर्वी मंगळवारी सोने 47017 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर (Gold Price Update) बंद झाले होते.

सराफा बाजारात बुधवारी सोन्यासह चांदीत तेजी दिसून आली.
बुधवारी चांदी 257 रुपये प्रति किलोच्या दराने महाग होऊन 63081 रुपयांच्या स्तरावर बंद झाली.
यापूर्वी मंगळवारी चांदी 62806 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली होती.

सोने 8945 आणि चांदी 16967 रुपये स्वस्त

अशाप्रकारे सोने अजूनही आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 8945 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16879 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

अशाप्रकारे भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47255 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47066
रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43286 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35441 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27644 रुपये प्रति 10 ग्र्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

 

Web Title : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 16th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tirupati Devasthan Trust | ‘मातोश्री’वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना ‘कॉल’; ‘तिरुपती ट्रस्ट’च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

Pune Fire News | पुण्यातील कंपनीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता; आग नियंत्रणात (व्हिडीओ)

Supreme Court | भांडणानंतर आत्महत्या ! 306 आयपीसी गुन्हा नाही – सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण