Gold Price Update | ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! 8000 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ मिळतेय सोने, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

नवी दिल्ली : Gold Price Update | आजपासून नवीन व्यवहाराच्या आठवड्याला सुरुवात होत आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसून आली. यामुळे आज सर्वांची नजर याकडे असेल की सोने-चांदीची (Gold Price Update) सराफा बाजारात वाटचाल कशी असेल.
मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढीचे सत्र कायम राहिले. परिणामी सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 8000 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा स्वस्त मिळत आहे. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16700 रुपयांपर्यंत स्वस्त (Gold Price Update) मिळत आहे.
आगामी दिवसात सोन्याच्या दरात तेजी
आज सराफा बाजार तीन दिवसानंतर उघडत आहे. शुक्रवारी (15 October) दसरा असल्याने बाजार बंद होता. तर शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे बाजार बंद होता. इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुटीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचे दर जारी करत नाही. जाणकारांनुसार आगामी दिवसात सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळू शकते.
सोने 8075 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त
सोने अजूनही आपल्या सर्वोच्च स्तरापासून 8075 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे.
सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता.
त्यावेळी सोने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 16690 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.
गुंतवणुकीसाठी सोने अजूनही सुरक्षित
सोन्याने मागील वर्षी 28 टक्के रिटर्न दिला आहे. त्याअगोदरच्या वर्षी सुद्धा सुमारे 25 टक्के रिटर्न होता. लाँग टर्मसाठी गुंतवणूक करत असाल तर सोने अजूनही गुंतवणुकीसाठी अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळतो.