Gold Price Update | सोन्यामधील घसरणीमुळे खरेदीदार खुश ! आता 27393 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (24 September) सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण नोंदली गेली आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतीत 294 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. या घसरणीनंतर (Gold Price Update) सोने 45401 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आले.

यापूर्वी गुरुवारी सोने 45,695 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. गुरुवारी सोन्याच्या उलट चांदीमध्ये तेजी नोंदली गेली. चांदी 26 रुपयांच्या किरकोळ तेजीसह 59609 रुपये प्रति किलोवर बंद झाली. यापूर्वी बुधवारी चांदी 59583 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली (Gold Price Update) होती.

तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये गुरुवारी सोन्याच्या (Gold) किमतीत 297 रुपयांची घसरण नोंदली गेली. या घसरणीनंतर सोने 46375 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर राहिले. गुरुवारी चांदीची किंमत 290 रुपयांच्या घसरणीसह 60,890 रुपये प्रति किलो राहिली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) नुसार गुरुवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण नोंदली गेली. IBJA नुसार गुरुवारी सोन्याच्या किमतीत 146 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. या घसरणीनंतर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46690 रुपयांच्या स्तरावर आला.

Life Certificate | Pensioners ने लक्ष द्यावे! हे अधिकारी रेकॉर्ड करू शकतात तुमचे Life Certificate, सरकारने केली नियुक्ती

तत्पूर्वी बुधवारी सोने 46826 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. तर चांदी 426 रुपये प्रति किलोग्रॅम स्वस्त होऊन 60362 रुपयांच्या स्तरावर आली. यापूर्वी बुधवारी चांदी 60788 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

भारतीय सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोने 46694 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46507 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 42772 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35120 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27393 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा भाव

जागतिक स्तरावर सोन्याच्या वायदा किमतीत घसरणीचे मुख्य कारण न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या किमतीत घसरण हे आहे.
गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 0.57 टक्केच्या घसरणीसह 1768.60 डॉलर प्रति औंसवर राहीले.
तर चांदीचा भाव 0.47 टक्केच्या घसरणीसह 22.80 डॉलर प्रति औंसवर राहीला.

सोने 9506 आणि चांदी 19618 रुपयांनी स्वस्त

अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9506 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांनी स्वस्त विकले जात आहे.
सोने आपल्या सर्वोच्च स्तरावर ऑगस्ट 2020मध्ये 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19618 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

हे देखील वाचा

Thane Gang Rape | 8 महिन्यापर्यंत प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केला गँगरेप, 33 जणांवर गुन्हा दाखल, 26 जणांना पोलिसांकडून अटक

Overripe Banana side effects | अशाप्रकारची केळीचं सेवन केल्यास फायद्याऐवजी होते मोठे नुकसान, जाणून घ्या

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Update | gold silver jewelry price rate update 24th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update