Gold Price Update | सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरुच, आता 26823 रुपयात मिळतंय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (1 October) सोन्यासह चांदीच्या किमतीत (Gold Price Update) सुद्धा तेजी दिसून आली. शुक्रवारी सोने 583 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने महागले. अशाप्रकारे शुक्रवारी सोने 46434 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर गुरुवारी सोने 45851 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा तेजी दिसून आली. या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी चांदीत 1463 रुपये प्रति किलोची तेजी नोंदली गेली. या तेजीनंतर शुक्रवारी चांदी 59581 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली. यापूर्वी गुरुवारी चांदी 58118 रुपये प्रति किलोच्या स्तरवर बंद झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर
अशाप्रकारे भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोने 45881 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 45667 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 42000 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 343888 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 26823 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

सोने 9766 आणि चांदी 21741 रुपयांनी स्वस्त
अशाप्रकारे सोने आजही आपल्या सर्वोच्च स्तरापासून 9766 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.

मागील काळात स्थानिक बाजारात सोने घसरून 45 हजार रुपयांच्या (Gold Price Update) खाली गेले होते. तर यावर्षी 1 जानेवारीला सोने 50,300 रुपयांवर होते. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 20399 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात घसरणीसह व्यवहार होत आहे.
आज अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 0.74 डॉलरच्या घसरणीसह 1,752.41 डॉलर प्रति औंसच्या दरावर होत आहे.
तर चांदीचा व्यवहार 0.14 डॉलरच्या तेजीसह 22.24 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होत आहे. (Gold Price Update)

Web Title :- Gold Price Update | gold silver jewelry price rate update 2nd september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Artificial Kidney | ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार ‘ही’ कृत्रिम किडनी, बंद होणार डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटचे त्रास; जाणून घ्या

Parambir Singh | ‘या’ प्रकरणात परमबीर सिंग यांना 21 ऑक्टोबरपर्यंत मोठा दिलासा; तूर्तास होणार नाही ‘ती’ कारवाई  

Vishwas Nangre Patil | विश्वास नांगरे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार; जाणून घ्या प्रकरण