Gold Price Update | 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालं सोनं, इथं जाणून घ्या 14,18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Update | आजपासून नवीन व्यवहाराच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीत (Gold Price Update) संमिश्र कल दिसून आला. सध्या सोने आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 8954 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला उच्चतम स्तर ऑगस्ट 2020मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले होते. तर चांदी 16505 रुपये प्रति किलो स्वस्त विकली जात आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चतम स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

Pune Crime | माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या पुतण्यांची घरे फोडून 1 किलो सोन्याच्या दागिन्यांसह 53 लाखांचा ऐवज लंपास

14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेटचे सोने 47246 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेटचे सोने 47057 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोने 43277 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे सोने 35435 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27639 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

शुक्रवारचे सोने-चांदीचे दर

या व्यवहाराच्या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटचा दिवस शुक्रवारी सोने 28 रुपयांच्या घसरणीसह 47246 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर चांदी 117 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह 63475 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाले.

UPI Payment | इंटरनेटशिवाय करता येते पेमेंट, जाणून घ्या UPI पेमेंटची पूर्ण प्रक्रिया

या आठवड्यात सोन्याची वाटचाल

या संपूर्ण आठवड्याच्या (30 August to 3 September) च्या दरम्यान सोन्याच्या किमतीत 77 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ नोंदली गेली. सोने सोमवारी 47149 रुपये, मंगळवारी 47239 रुपये, बुधवारी 47279 रुपये, गुरुवारी 47274 रुपये आणि शुक्रवारी 47246 प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

आठवड्यात चांदीची वाटचाल

या संपूर्ण व्यवहाराच्या आठवड्यात (30 August to 3 September) चांदीत 463 रुपये प्रति किलोची घसरण नोंदली गेली. चांदी सोमवारी 63804 रुपये, मंगळवारी 63804 रुपये बुधवारी 63072 रुपये, गुरुवारी 63592 रुपये आणि शुक्रवारी 63475 प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

गुंतवणुकदारांनी करावी आणखी थोडी प्रतिक्षा!

सराफा बाजारच्या तज्ज्ञांनुसार सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी घसरण होईल. सोने पुन्हा एकदा
45,000 हजार प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68000 प्रति किलोच्या जवळपास येऊ शकते. अशावेळी ज्या
लोकांना सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी थोडी प्रतिक्षा करणे चांगले ठरू शकते.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Update | gold silver jewelry price rate update 6th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update