Gold Price Update | 8666 रुपये प्रति तोळा ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, येथे जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Update | जर तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत लागोपाठ घसरणीनंतर पुन्हा तेजीचे सत्र सुरू झाले आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी (6 September) सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी (Gold Price Update) नोंदली गेली आहे.

सोमवारी सोन्याच्या किमतीत 288 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी नोंदली गेली. या वाढीसह सोने 47534 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचले. यापूर्वी शुक्रवारी सोने 47246 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

सोमवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा वाढ झाली. चांदी 1482 रुपये प्रति किलो महागली. यासोबत चांदी 64957 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहचली. यापूर्वी शुक्रवारी चांदी 63475 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.

सोने 8666 आणि चांदी 15023 रुपयांनी स्वस्त

या वाढीसह सोने सोमवारी आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 8666 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. तर चांदी 15023रुपये प्रति किलो स्वस्त विकली जात आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

सोमवारी भारतीय बाजारात 24 कॅरेटचे सोने 47534 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेटचे सोने 47344 रुपये प्रति
10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोने 43541 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे सोने 35651 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14
कॅरेटचे सोने 27807 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते.

हे देखील वाचा

Ration Card | रेशन कार्डमध्ये ‘या’ पध्दतीने नोंदवा कुटुंबातील सदस्याचे नाव, ‘फ्री’ धान्यासह मिळतील ‘हे’ जबदस्त फायदे; जाणून घ्या प्रक्रिया

Shashi Tharoor | शशी थरूर यांनी गायले – ’एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई…’ ऐका त्यांचा सुरेल आवाज, VIDEO

Crime News | गुंडाचा त्याच्याच मित्राने केला घरात घुसून खुन; कारण समजल्यावर पोलीसही झाले ‘अचंबित’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Update | gold silver jewelry price rate update 7th september know latest rate indian sarafa market

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update