आर्थिकताज्या बातम्याराष्ट्रीय

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत बंपर घसरण, खरेदीदारांमध्ये आनंद; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | तुम्हालाही लग्नसमारंभासाठी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या – चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. या घसरणीनंतर सोने पुन्हा एकदा 50000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 59000 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. यासोबतच सोने आपल्या ऑल टाइम हायपासून 57000 रुपयांनी तर चांदी 20800 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. (Gold Price Update)

 

सुट्टीच्या दिवशी जारी होत नाही दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन India Bullion and Jewellers Association (IBJA) ची वेबसाइट सुट्टीच्या दिवशी बंद असते. त्यामुळे शनिवार आणि रविवारी बंद ठेवल्यानंतर सोमवारी बुद्ध पौर्णिमेमुळे आजही बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यामुळे आता बाजार थेट मंगळवारी उघडणार आहे. इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन राष्ट्रीय सुट्ट्या तसेच शनिवार आणि रविवारी सोन्या – चांदीचे दर जारी करत नाही. (Gold Price Update)

 

शुक्रवारची सराफा बाजाराची स्थिती
गेल्या आठवड्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्यासह चांदी पुन्हा एकदा स्वस्त झाली आहे.
या आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 653 रुपयांनी आणि चांदीचा भाव 690 रुपयांनी कमी झाला.
शुक्रवारी सोने प्रति दहा ग्रॅम 653 रुपयांनी स्वस्त होऊन 50465 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

तत्पूर्वी, गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने प्रति 10 ग्रॅम 87 रुपयांनी स्वस्त होऊन 51118 रुपयांवर बंद झाले.
तर शुक्रवारी चांदी 690 रुपयांनी स्वस्त होऊन 59106 रुपये किलोवर बंद झाली.
तत्पूर्वी गुरुवारी चांदी 1654 रुपयांनी स्वस्त होऊन 59796 प्रति किलो पातळीवर बंद झाली.

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव
शुक्रवारी 24 कॅरेट सोने 653 रुपयांनी स्वस्त होऊन 50465 रुपयांवर आला, 23 कॅरेट सोने 650 रूपयांनी स्वस्त होऊन 50263 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 598 रुपयांनी स्वस्त होऊन 46226 रुपये झाले, 18 कॅरेटचे सोने 490 रुपयांनी स्वस्त होऊन 37849 रुपये झाले.
14 कॅरेटचा भाव 382 रुपयांनी स्वस्त होऊन तो 29522 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला.

 

ऑल टाइम हायपासून सोने 5735 तर चांदी 20874 रुपये स्वस्त

या घसरणीनंतर सोने आपल्या ऑल टाइम हायपासून 5082 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात होते.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सार्वकालिक उच्चांक गाठला.
त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
त्याच वेळी, चांदी तिच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 20184 रुपये प्रति किलो स्वस्त दराने विकली जात होती.
चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या – चांदीत अस्थिरता
रशिया आणि युक्रेनमध्ये 81 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता असताना भारतासह जगभरातील सराफा बाजारात अस्थिरतेची स्थिती आहे.
अशा स्थितीत जगभरात सोन्या – चांदीच्या दरात अस्थिरता आहे.

 

Web Title :- Gold Price Update | gold silver jewelry rate price latest update 16th may 2022 know latest rate indian sarafa market

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button