Gold Price Update | महाग झाले सोने, आता 28793 रुपयात मिळतेय 1 तोळा; इथं जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत (Gold-Silver Price Today) तेजी जारी आहे. जाणकारांनुसार, लवकरच सोन्याच्या किमती 53000 रुपयाच्या स्तरावर जाऊ शकतात. अशावेळी जर तुम्ही आता सोने खरेदी केले तर येत्या काही दिवसात चांगला नफा होऊ शकतो. (Gold Price Update)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

या व्यवहाराच्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोने 21 रुपयांच्या वाढीसह 48196 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. यापूर्वी बुधवारी सोने 48175 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरावर बंद झाले होते. जाणकारांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सोन्याच्या किमतीत आज तेजी आली आहे.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

गुरुवारी चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. चांदीची किंमत 121 रुपयांनी कमी होऊन 65147 रुपये प्रति किलोग्रॅम राहिली. यापूर्वीच्या व्यवहाराच्या सत्रात चांदीचा दर 65268 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर

अशाप्रकारे गुरुवारी भारतीय सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर 49219 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 49022 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 45085 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 36914 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने जवळपास 28793 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत होते. (Gold Price Update)

 

सोने 6981 आणि चांदी 13697 रुपयांनी स्वस्त

अजूनही सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 6981 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त मिळत आहे.
सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. (Gold Price Update)

 

तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 13697 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे.
चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

Web Title :- Gold Price Update | gold silver jewelry rate price latest update 19th november 2021 know latest rate indian sarafa market today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा