Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Weekly | मागील आठवड्यात किंचित वाढ झाल्यानंतर या आठवड्यात सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव 51 हजार प्रति 10 ग्रॅमच्या आकड्यावरून खाली (Gold Price Fall) आला आहे. जागतिक बाजारातही (Global Market) या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी (2 सप्टेंबर) सोन्याचा भाव 50,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी सोमवारीच सोन्याच्या किमतीत घसरण झाली आणि आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51 हजारांच्या खाली बंद झाला. (Gold Price Weekly)

 

किती स्वस्त झाले सोने ?

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याचा दर (Gold Price Weekly) 1,438 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 51,908 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. जागतिक बाजारातही या आठवड्यात सोन्याचा दर 2.2 टक्क्यांनी घसरला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्डचा दर 1,697 रुपये प्रति औंस होता. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी सोने स्वस्त होऊ शकते. (Gold Price Weekly)

 

या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण

या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत घसरण झाली. सोने 51,231 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मंगळवारी सोन्याचा भाव 51,325 वर बंद झाला होता. गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी व्यवहार बंद होते. पण गुरुवारी बाजार उघडला तेव्हा सोन्याचा भाव 50,401 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. शुक्रवारी सोन्याचा भाव 50,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 2 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,584 रुपये होता.
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 50,381 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सर्व प्रकारच्या सोन्याचे दर कर न लावता मोजले गेले आहेत. सोन्यावरील जीएसटी चार्जेस वेगळे भरावे लागतात.
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर कर व्यतिरिक्त मेकिंग चार्जेस लागू होतात.
त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढल्या आहेत.

 

Web Title : –  Gold Price Weekly | gold price weekly 26 august to 2 september sona kitna sasta hua know the new rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा