29 सप्टें. पासून नवरात्री सुरू, सणाच्या काळात पुन्हा 40 हजारच्या वर जाणार सोनं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पितृपक्ष संपणार आहे आणि 29 सप्टेंबरपासून नवरात्रांस सुरु होणार आहे, या दरम्यान सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. मात्र यंदा सोन्या चांदीच्या भावात तेजी आल्याने या सणासुदीला सोने 40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पार करण्याची शक्यता आहे.

कमोडिटी बाजार विश्लेषकांचे मानले तर सणासुदीला सोने 40,000 रुपये गाठणार आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास सोने 1,500 – 1,600 डॉलर प्रति औंसच्या दरम्यान असेल.

दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 37,150 रुपये प्रति 10 ग्रॅम (22 कॅरेट) आहे तर 24 कॅरेट सोने 38,350 रुपये आहे. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली ज्यामुळे सोन्याच्या भावात तेजी दिसून आली.

केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. गुंतवणूक सोन्यात पैसे गुंतवत आहेत त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

सणासुदीला सोने महाग –
देशात नवरात्रीनंतर दिवाळी हा मोठा सण आहे. या दरम्यान मुहूर्त म्हणून लोकांचा सोने खरेदीकडे जास्त ओढा दिसतो. नवरात्रीपासून सुरु झालेली मागणी दिवाळीपर्यंत कायम दिसेल. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असतील त्यामुळे सराफ बाजारात सोन्या चांदीची मागणी कायम असेल.

शक्यतो वस्तू स्वस्त झाली की लोकांकडून त्याची मागणी वाढते मात्र सराफ बाजारात वेगळी परिस्थिती असते, तेथे सोने महाग झाले की मागणी वाढते कारण गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित समजतात.

मुंबई कमोडिटी कंसल्टेंट टी गणशेखर यांनी सांगितले की अमेरिका चीन व्यापार युद्धचा परिणाम सोन्याचा दरावर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार सोन्याची मागणी जास्त आहे. पुढील महिन्यात सोने 1,600 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहचू शकते.

भारतीय वायदा बाजर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याच्या दरात तेजी आल्याने 38,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर चांदी 178 रुपयांनी वाढून 48,200 रुपये प्रति किलो झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,538.15 डॉलर प्रति औंस आहे तर चांदी 18.64 डॉलर प्रति औंस आहे.

Visit : policenama.com