‘या’ कारणामुळं सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सोन्याच्या केिंमतीत वाढ होताना दिसत आहे. एकीकडे रुपया कमजोर होत आहे तर इंधनाचे दर देखील भडकत असताना सोन्याने देखील उच्चांकी गाठली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भावात 460 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 38,860 रुपये प्रति ग्राम झाले आहेत. तसेच चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. चांदीचे दर 1 किलोमागे 47,957 रुपये झाले आहेत.

सोन्याच्या किंमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे सामान्यांना सोने खरेदी करणं महागलं आहे. परंतू तज्ज्ञच्या मते या काळात सोन्यात केलली गुंतवणूक फायदेशीर ठरेल असे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,504 डाॅलर प्रति औंस आणि चांदीची किंमत 17.87 डाॅलर प्रति औंस वर पोहचली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढ पाहायला मिळत आहे. भारतीय रुपया डाॅलरच्या तुलनेत 68 पैशांनी घसरुन 71.60 रुपये झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमतीत अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर कच्च्या तेलाच्या किंमती आणि रुपया घसरल्याने सोन्याचा भाव वाढले आहेत.