चांदीला एकाच दिवसात 2,070 रुपयांच्या दर वाढीची ‘चकाकी’, सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा ‘वाढ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किमतींनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. आज पुन्हा एकदा सोने 39,126 रुपयांवरुन 39,248 रुपयांवर पोहचले. सोन्याच्या किंमती आज 122 रुपयांनी वाढल्या आहेत. आज चांदीचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून 50,125 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. आज चांदी 2,070 रुपयांनी महागली. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव 1,537 डॉलर प्रति औंस राहिले तर चांदी 19.27 डॉलर प्रति औंस राहिली.

काल देखील सोन्याचे भाव पुन्हा वधारले होते. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारात काल सोन्याच्या किंमती 31,126 रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत वाढल्या होत्या. याबरोबरच चांदी देखील तळपली होती, चांदीच्या दरात 1,080 रुपये इतकी वाढ झाली होती. यामुळे काल चांदीचे भाव 47,960 रुपयांवर पोहचले होते. औद्योगिक क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने चांदीच्या किंमती अचानक वाढल्या. त्यामुळे सामान्यांना सोने खरेदी करणे महागणार आहे. आज सोन्याचे किंमती 39,248 रुपये प्रति 10 ग्राम झाले आहेत.

सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तसेच जगात मंदी सदृश्य परिस्थिती असल्याने लोक सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे सोन्याची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –