Gold Prices Dip | चीनमधून आली बातमी…आणि सोन्याचा भाव कोसळला! गुंतवणूक केल्यास होऊ शकते नुकसान, जाणून घ्या…कारण

नवी दिल्ली : Gold Prices Dip | सोने आणि चांदीच्या दरात मागील काही काळापासून कायम तेजी दिसून आली. यामुळे दोन्ही धातू वाढून लाईफ टाइम हायवर पोहचले. विकसनशील देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोन्याची विक्रमी खरेदी हे किमतीत आलेल्या तेजीचे कारण सांगण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी (७ जून) सोन्याच्या किमतीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. घसरणीचे कारण चीनच्या केंद्रीय बँकेकडून (China Central Bank) सोन्याची खरेदी बंद करणे मानले जात आहे.(Gold Prices Dip)

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात हाजीर सोन्याचा भाव १.८% घसरून २,३३३.६९ डॉलर प्रती औंसवर आला. इतकेच नव्हे तर सोन्याने या आठवड्यात आलेली तेजी, बाजार बंद होता-होता गमावली. सोने आतापर्यंत या आठवड्यात केवळ ०.३% वर आहे.

चीनने मे मध्ये सोन्याची खरेदी केली नाही. सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात २० मे रोजी रेकॉर्ड हाय २,४४९.८९ प्रती
औंसवर पोहचला होता.

भारतीय सराफा बाजरात सोन्याचा दर २१ मे रोजी ७४२२२ रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहचला.
तसेच चांदीचा भाव २९ मे रोजी ९४२८० रुपये प्रती किलो ऑल टाईम हाय होता. शुक्रवारी बंद झालेल्या व्यवहाराच्या
आठवड्यात सोने घसरून ७१९१३ रुपये प्रती १० ग्रॅम आणि चांदी ९०५३५ रुपये प्रती किलोवर बंद झाली.
चीनमधून आलेल्या बातमीचा परिणाम भारतीय बाजारात सुद्धा दिसून आला.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,‍ या बातमीचा परिणाम अजूनही बाजारात कायम राहील आणि सोने सोमवारी आणखी खाली जाऊ शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katraj Pune Crime News | पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पकडले, 4 कोयते जप्त

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शे कार अपघाताचे विश्लेषण करण्यासाठी लष्कराची मदत घेणार, नेमका अपघात कसा झाला हे समजणार

Chandrakant Patil | नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Chandrakant Patil Birthday | वृक्षसंपदा अभियानाअंतर्गत 65000 देशी झाडे लावण्याचा संकल्प – चंद्रकांत पाटील.