Gold Rates : खरेदीची सुवर्णसंधी ! आतापर्यंत 12 हजारांनी स्वस्त झाले सोनं, जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या आणि पुन्हा लॉकडाउनचे संकट गडद बनल्यानंतर कमाेडिटी बाजारात तेजी दिसून आली आहे. आर्थिक अनिश्चितता वाढू लागल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. आज व्यवहार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचे भाव 160 रुपयांनी वाढून 43 हजार 680 रुपये प्रतितोळा झाले आहेत. सोमवारी सोन्याचे दर 43 हजार 520 रुपये प्रतितोळा होते. MCX वर सोन्याची वायदा किंमत 44 हजार 360 रुपये तोळा होती, तर चांदीचे दर वाढून 66 हजार 202 प्रतिकिलो झाले आहेत.

सोन्याच्या दरात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सोन्याचे दर गेल्या 11 महिन्यांतील नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रतितोळ्यावर पोहाेचले होते. या स्तरावरून आतापर्यंत सोन्याच्या दरात 12000 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्लीतील सोन्याचा आजचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 44 हजार 120 रुपये प्रतितोळा आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 760 रुपये प्रतितोळा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 42 हजार 210 रुपये प्रतितोळा, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 050 रुपये प्रतितोळा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे भाव स्थित आहेत. सोन्याचे दर 1687.90 डॉलर प्रतिऔंसवर आहे. चांदीचे दर 25.12 डॉलर प्रतिऔंसपर्यंत वाढला असून, प्लॅटिनममध्येही 1 टक्क्याने वाढ झाली आहे. यानंतर प्लॅटिनमचा दर 1136.57 डॉलर झाला आहे.

सोन्याचा दर 63 हजार पार करण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते 2021 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्केट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, जर सोन्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली, तर हे दर 63 हजार रुपये प्रतितोळा या रेकॉर्ड स्तरावर पोहाेचतील.