home page top 1

खुशखबर ! दिवाळीपुर्वी सोनं झालं ‘स्वस्त’, चांदीची ‘चकाकी’ वाढली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय संकेतानुसार सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात सोने 30 रुपयांनी स्वस्त झाले, त्यामुळे सोन्याचे भाव कमी होऊन 38,955 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. औद्योगिक मागणी वाढल्याने चांदी 150 रुपयांनी महागली, त्यामुळे चांदी 46,750 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमतीमध्ये घसरणीमुळे आणि सणासुदीच्या दिवसात खरेदीमध्ये घसरणीमुळे 24 कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याच्या किंमतीत घट झाली. न्यूयॉर्कमध्ये सोने 1,488.76 डॉलर प्रति औंस राहिले तर चांदी 17.67 डॉलर प्रति औंस राहिले.

सोने शनिवारी 38,985 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर गोल्ड फ्यूचरच्या भावात घसरणं झाली होती. सोमवारी गोल्ड फ्यूचरच्या भावात घसरण झाली. सोमवारी गोल्ड फ्यूचरचे भाव 68 रुपयांनी घसरुण 38,021 रुपये प्रति 10 ग्रॅमला बंद झाले. पटेल यांनी सांगितले की अमेरिका आणि चीन व्यापारासंबंधित आपले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमती घसरताना दिसल्या.

Visit  :Policenama.com

 

Loading...
You might also like