खुशखबर ! सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्या, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घट झाली आहे. सध्या सोन्याची किंमत १० ग्रॅमवर ४४,६८० रुपये आहे. मागील वर्षी प्रति १० ग्रॅम ५७००० रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. त्यानंतर सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले.

किंमत का होत आहे कमी ?
जेव्हा जागतिक बाजारात स्थिरता निर्माण होते. तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात. आता लोकसुद्धा स्टॉक मार्केटसारख्या इतर उपकरणांमध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत. ज्या ठिकाणावरून कमी दिवसांत अधिक उत्पन्न मिळते. तसेच अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत आणि रोजगाराच्या आकडेवारीतदेखील सुधारणा झाली आहे. तसेच बॉण्ड्ससारख्या साधनांवर भेटणाऱ्या वाढत्या परताव्यामुळे सोने कमकुवत होत चालले आहे.

पुढे सोन्याच्या किमती वाढणार की कमी होणार ?
सोन्याची ही कमकुवतता काही दिवसांपर्यंत अशीच राहणार आहे. सध्या डॉलर घसरत असल्यामुळे चलनवाढीचा दबाव वाढत आहे आणि या सर्वांमुळे पुढील दिवसांत सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात.

२०२० मध्ये वेगाने वाढ झाली
गत वर्षी कोरोना वायरसमुळे २०२० मध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ज्यामुळे लोकांकडून गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधण्यात येत आहेत. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते. कोरोनामुळे लोकांनी शेअर बाजारामधील गुंतवणूक कमी केली, कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक आहे. गत वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत सोन्याच्या किमती हळूहळू वाढू लागल्या. मात्र, जेव्हा मार्चमध्ये कोरोना विषाणू पसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत वेगाने वाढ झाली आहे.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर घट झाली
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१ च्या अर्थसंकल्पामध्ये सोने आणि चांदीवरील आयात करात मोठी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार निर्मला सीतारमन यांनी सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात पाच टक्क्यांनी कपात केली. आता सोने-चांदीवर १२.५ टक्क्यांऐवजी केवळ ७.५ टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. निर्मला सीतारमन यांच्या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करण्यात येते. चीननंतर भारत सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश आहे.