खुशखबर ! महिन्याभरात 1900 रूपयांनी ‘स्वस्त’ झालं सोनं, खरेदीची ‘सुवर्ण’संधी कधी ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीआधी सोन्याच्या किंमतीत सतत घट होताना दिसत आहे. गेल्या हप्त्यातही हे सुरुच होतं. शुक्रवारी दिवसभराच्या व्यवसायानंतर MCX वर गोल्ड फ्युचर रेट 106 रुपये म्हणजेच 0.28 टक्के प्रतिग्रॅम स्वस्त होऊन 38090 रुपयांच्या स्तरावर बंद झाला आहे. चांदीच्या दरातही घट पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस MCX वर चांदी 0.1 टक्के कमी होऊन 45500 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती. ग्लोबल मार्केटमध्येही सोन्याचा भाव 0.32 टक्क्यांनी घट होत 1493 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 0.24 टक्के कमी होऊन 15.57 डॉलर औंस राहिला होता.

गेल्या महिन्याभरात 1900 रुपये स्वस्त झालं सोनं
गेल्या महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास 40000 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून या महिन्यात 1900 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट पाहायला मिळत आहे. आता सराफांनाही आशा आहेत की धनतेरस आणि दिवाळीच्या आधी किरकोळ खरेदीत तेजी पाहायला मिळणार आहे. हे लक्षात घेता किरकोळ विक्री करणारे अनेक ज्वेलर्स प्रमोशनल ऑफर्स देताना दिसत आहेत.

जागतिक कारणांमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार
गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल इक्विटी इंडेक्समध्ये वाढ झाल्याने सोन्याचा भाव एका मर्यादीत चौकटीत दिसत आहे. याउलट जागतिक बाजारात मंदीमुळे सोन्याच्या किंमतीत सपोर्ट पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या ट्रेड वॉरमध्ये अनिश्चितता असल्याने करंसी मार्केटमध्ये चढ-उतार पहायला मिळाला आहे. हेच कारण आहे की, डॉलरच्या वस्तूंचा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम होताना दिसत आहे.

visit : Policenama.com