‘या’ कारणामुळे गेल्या साडेतीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत ७७०० रुपयांनी घट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत घट होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Investor) धक्के बसत आहेत. मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या २ दिवसांपासून मोठी घसरण झाली आहे. तसेच शेअर बाजारातही (share Marekt) घसरण होताना दिसत आहे. या वर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना जसा चांगला परतावा दिला, तसाच परतावा शेअर बाजारांनीही दिला. मात्र, आता या दोन्हींमध्ये घसरण होताना दिसत आहे. मागील साडेतीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत ७७०० रुपयांची घट झालेली पाहायला मिळत आहे.

सोने – चांदीमध्ये घसरण
कोरोनावरील लस लवकर उपलब्ध होणार आहे, या वृत्ताने सोन्याच्या किमतींत घसरण होताना दिसत आहे. गुरुवारी मल्टिकमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) चार डिसेंबरच्या सोन्याच्या वायद्यांत ११ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४८,५२४ इतका झाला आहे. चांदीच्या किमतीतही २९९ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीसुद्धा प्रतिकिलो ६०,१४२ इतकी झाली आहे.

सोन्याचा भाव ४९ हजारांच्या खाली
सध्या सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमसाठी ४८,५२४ रुपये इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅम १६०० रुपयांची घट झाली होती. सोन्याच्या भावात सर्वाधिक वाढ ७ ऑगस्टला प्रतिग्रॅम ५६,२०० इतकी झाली होती. त्यानंतर साडेतीन महिन्यांच्या कालावधीत हा भाव ७७०० रुपयांनी घसरून ४८,५२४ इतका झाला आहे. याच कालावधीत चांदीच्या प्रतिकिलो भावामध्येही १७,००० रुपयांची घसरण होऊन चांदी प्रतिकिलो ६०,१४२ इतकी झाली आहे.

सोने आणखी घसरणार ?
येणाऱ्या काही दिवसांत लशीच्या उप्लब्धतेमुळे लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती थोडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीत घट होताना दिसणार आहे. अशातच अमेरिकेत जो बायडेन यांनी निवडणुकीत विजय मिळवला असून, ते आता सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. बायडेन सत्तेवर येत असल्याने चीनबरोबर सुरू असणारे व्यापारयुद्ध शांत होण्याची शक्यता आहे. व्यापारयुद्ध शांत झाले तर जगभरातील आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ शकतात. त्यामुळे आर्थिक संकट कमी होऊ शकते.

अर्थव्यवस्थेत वेगवान सुधारणा
भारत, अमेरिकेसह जगभरातील अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून आता सोन्याऐवजी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती घसरताना पाहायला मिळत आहेत. सध्या जागतिक बाजारांमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ तेजी पाहायला मिळत आहे.

सोने-चांदीचा दर आलेख
७ ऑगस्ट : ५६,२०० रुपये सोन्याची प्रतिग्रॅम सर्वाधिक किंमत

सध्याची सोन्याची सरासरी किंमत : ४९,००० रुपये

गेल्या साडेतीन महिन्यांत चांदीच्या किमतीतील घट : १७,००० रुपये

You might also like