सोनं खरेदीची ‘सुवर्ण’संधी ; सोन्याच्या दरात प्रतितोळा २ हजारांनी घट

मुंबई : वृत्तसंस्था – आंतराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर घसरल्याने गेल्या काही दिवसात सोन्याचे दर तब्बल दोन हजारांनी कमी झाले आहेत.

त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला खऱ्या अर्थाने झळाळी येणार आहे. सोन्याच्या बाजारपेठेचा विचार केल्यास, दिडमहिन्यापूर्वी ३४ हजार ४०० वर असलेले सोने बुधवारी ३१ हजार ७०० तर चांदी ४१ हजार ८०० वरून ३७ हजार ८०० वर आले आहे. दिवाळीपासूनचा हा निच्चांकी दर आहे. ऐन लग्नसराई आणि वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी पहिला असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कमी झालेला हा दर म्हणजे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे सोने – चांदी खरेदीला आता उधान येणार आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व देशवासीयांना ही गोड बातमी मिळाली आहे, खरं तर या शुभ मुहूर्तावर सर्वच सोन्याच्या पेढ्यांवर सोनं खरेदीला लोकांची गर्दी होत असते. यावेळी सोन्याच्या दरात झालेली घरसन पाहता खऱ्या अर्थाने सोने खरेदीला झळाळी येणार आहे. सोन्याच्या दरातील घसरन ही जरी मोठी नसली तरी ऐन लग्नसराई तसेच गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त पाहिला तर निश्चितच लोकांना दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यामुळे यावर्षीच्या पहिल्याच मुहूर्तावर लोकांकडून मोठी सोनेखरेदी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.