खुशखबर ! सोन्याच्या दरात तब्बल 2600 रूपयांची ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे देशभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना सोन्याच्या दराबाबत मात्र काहीशी समाधानकारक बातमी मिळते आहे. एकीकडे सोन्याच्या किंमती वाढतील असा अंदाज असताना शुक्रवारी सोन्याच्या दारात मोठी घसरण झाली आहे. शेअर मार्केट कोसळले असताना बुधवारी सोन्याचा दर ५१६ रुपयांनी कमी झाला. तर आजही सोन्याच्या दरात मोठी घट पाहायला मिळत आहे.

आज सोन्याच्या दरात आणखी घट झाली असून हे दर तब्बल 2600 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे आता सोन्याचा दर 41,600 वर पोहोचला आहे. एकीकडे शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर बाजारातील उलाढालीच्या परिणामामुळे सोनं स्वस्त झालं. सोमवारी सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी 45 हजार 33 रुपयांपर्यंत पोहोचला होता. सोन्याचे दर कमी होण्यामागे अमेरिकन डॉलरची किंमत रुपयाच्या तुलनेत कमी होणं हे असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी वधारला. याशिवाय जागतिक स्तरावर पोषक वातावरणामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.