Gold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त ! जाणून घ्या आता गुंतवणूक केली तर 2021 अखेरपर्यंत किती मिळू शकतो नफा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या अखेच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी म्हणजे 24 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price) घसरणीचा कल राहिला. या दिवशी सोने 365 रुपयांनी कमी होऊन 45,141 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. तर, चांदीच्या किमतीत (Silver) 21 रुपयांची किरकोळ वाढ नोंदली गेली आणि ती 59,429 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली. बरोबर दोन महिन्यापूर्वी म्हणजे 26 जुलै 2021 ला सोन्याचा दर 46,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. स्पष्ट आहे की दोन महिन्यांच्या आत सोन्याच्या दरात 1,359 रुपयांची मोठी घट (Gold Prices Slipped) नोंदली गेली आहे.

का वाढू शकते सोन्याची किंमत
सोने सध्या आपल्या सर्वोच्च स्तरापासून (Gold Record High) खुप खाली आहे. अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जात आहे की यावर्षी सोन्याची किंमत मागील सर्व विक्रम मोडू शकते. अशावेळी सध्याच्या दरात खरेदी केल्यास आगामी काळात मोठा नफा (High Return) मिळू शकतो.

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर (Gold Prices) गाठला होता.
आता 24 जुलै 2021 च्या बंद भावासोबत याची तुलना केली तर सुमारे 11,059 रुपये प्रति 10 ग्रॅम खाली आहे.
तज्ज्ञांनुसार, जर सणासुदीमध्ये (Festive Season) सोन्याच्या खरेदीत वाढ झाली तर मागणी वाढण्यासह सोन्याचे दर नवीन विक्रम बनवू शकतात.

 

गुंतवणुकदारांनी काय करावे

तज्ज्ञांनुसार, 2021 च्या अखेरपर्यंत सोन्याचा दर आपला मागील विक्रम मोडत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकतो.
मात्र, आता यामध्ये मोठा चढ-उतार दिसून येऊ शकतो.
अशावेळी गुंतवणुकदारांनी मोठा कालावधी (Long Term Investment) आणि स्टॉपलॉस लावून खरेदी केली तर मोठा नफा कमावू शकतात.

जर कोरोनाची तिसरी लाट आली आणि राज्यांना पुन्हा लॉकडाऊनचा आधार घ्यावा लागला तर व्यवसायिक हालचाली पुन्हा प्रभावित होतील.
अशावेळी सर्वात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्यात खरेदी वाढू शकते. यातून सोन्याच्या दराला समर्थन मिळेल.

Web Titel :- Gold Prices | gold prices fell by rs 1359 in 2 months know how much gold will give return in 2020 if invest now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘मनसे’च्या रूपाली पाटील संतापल्या, म्हणाल्या – ‘सुधरा रे सुधरा, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची’ (व्हिडीओ)

Pune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन

Gulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, आगामी 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (व्हिडिओ)