Gold Prices | तज्ज्ञांचा अंदाज ठरत आहे खरा; जाणून घ्या सोन्याचे सध्याचे दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे लग्नघरी सोने खरेदीची (Gold Prices) लगबग सुरू आहे. मात्र, सराफ दुकानात सोने खरेदीसाठी जाणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. गेले अनेक दिवस सोन्याचे दर (Gold Prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, ती आता खरी ठरली आहे. आज सोन्याचे दर 54 हजारांपर्यंत पोहोचले आहेत.
bullions या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर (Gold Prices) 250 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे एक तोळे सोन्यासाठी ग्राहकांना 54,080 रुपये मोजावे लागणार आहेत, तर चांदीचे दर 67,020 प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. आता, 24 कॅरेट सोन्यासाठी प्रतितोळे 53,950 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 22 कॅरेट सोने जवळपास आता 49, 450 रुपये झाले आहे. तत्पूर्वी, 1 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 50 ते 51 हजार रुपये होता. म्हणजेच सोन्याच्या किमतीत आता जवळपास 3900 रुपयांनी वाढ झाली आहे.
गेले अनेक दिवस अशा भाववाढीचा अंदाज वर्तविला जात आहे. वर्षअखेर देशात सोन्याचा भाव ५६ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ज्याची भीती होती अखेर तेच होत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (Indian Standard Organization) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला दिला आहे. 18 कॅरेटच्या सोन्यावर 750, 21 कॅरेटच्या सोन्यावर 875, 23 कॅरेटच्या सोन्यावर 958, तर 24 कॅरेटच्या सोन्यावर 999 लिहिलेले असते.
Bullions नुसार 24 ते 14 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याचे दर १ ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,408 54,080
22 कॅरेट 4,957 49,573
20 कॅरेट 4,507 45,067
18 कॅरेट 4,056 40,560
16 कॅरेट 3,605 36,053
14 कॅरेट 3,155 31,547
Web Title :- Gold Prices | gold silver rate today 22 and 24 karat gold price today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार