सोनं खरेदी करणार्‍यांना मोठा झटका ! 10 ग्रॅमचा दर होऊ शकतो 45000 च्या ‘पार’, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. परंतु जर तुम्ही सोन्याचे दागिणे खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला झटका बसू शकतो. मागील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीत बराच उतार चढाव पाहायला मिळाला. पहिल्यांदा अमेरिका – इराण तणाव आणि त्यानंतर अमेरिका – चीन मधील व्यापार युद्धामुळे सोन्या चांदीच्या भावात तेजी आली आहे. 10 ग्रॅम सोने 42 हजार पार झाले आहे. परंतु तणाव जसं जसा कमी झाला तसं तसे सोनं 39,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते. बाजारातील जाणकार सोन्यात घट होण्याची शक्यता व्यक्त करत होते परंतु त्यानंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली.

यामुळे वाढले दर
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशावर परिणाम झाला. ग्लोबल मार्केटमध्ये खळबळ उडाली. अनेक देशात या व्हायरसमुळे अलर्ट लागू करण्यात आला होता. जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसमुळे भीतीच्या छायेत होते. यामुळे कमोडिटी बाजारात शांतता राहिली. भारतीय बाजारात सोन्याचे दर 43,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. असा शक्यता उपस्थित होत आहे की सोनं 45,000 रुपयांपर्यंत पोहचू शकते.

सोमवारी सोनं 406 रुपयांनी वाढून 43,269 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोनं जूनच्या अनुबंधानुसार 406 रुपये किंवा 0.75 टक्क्यांनी वाढून 43,269 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. यात 125 लॉटचा व्यवसाय झाला. यासह सोनं एप्रिलमध्ये 401 रुपये किंवा 0.94 टक्क्यांनी वाढून 43,067 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यात ते 2,117 लॉट व्यवसायावर पोहोचले. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोनं 0.93 टक्क्यांनी वाढून 1,664.20 डॉलर प्रति 28.34 ग्रॅमवर ट्रेंड होतं होते.