Gold Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महागलं सोनं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. या आठवड्यात फेडरल रिझर्वच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तसेच डॉलरमध्येही कमजोरी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रित करण्यासाठी फेडने उचललेल्या उपायांवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. हेच कारण आहे की सोमवारी अमेरिकेतील स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,953.37 डॉलर झाली. तथापि, अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वाढून ते 1,960.50 डॉलर प्रति औंस झाले.

अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये 0.1 टक्क्यांची कमजोरी दिसून येत आहे. हेच कारण आहे की इतर देशांचे चलन असलेल्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

अमेरिकेत मदत पॅकेज जाहीर केल्याने वाढू शकतात किंमती
तथापि, फेड रिझर्व्ह कमिटीचे सभासद आणि अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडेही त्यांचे लक्ष आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकेला आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी जेरोम पॉवेल काय दृष्टिकोन बाळगतात यावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अद्याप आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले तर ते डॉलरमध्ये कमकुवत होण्याचे कारण आहे. गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कमकुवत डॉलर सकारात्मक ठरेल.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील सरकार आणि मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत पॅकेज जाहीर केले आहे. यंदा सोन्याच्या दरामध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.