Gold Price Today : सोनं 278 तर चांदी 875 रूपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन डॉलरमधील कमकुवततेमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्या आहेत. यामुळे आज देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २८७ रुपयांनी वाढला. तर याच दरम्यान चांदीच्या भावात ८७५ रुपयांची वाढ झाली. मात्र तज्ञ या वाढीला टिकाऊ मानत नाहीत. सध्याच्या स्तरावरुन सोन्यात तीव्र विक्री होण्याची शक्यता आहे असा त्यांचा विश्वास आहे. कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रति औंस १९०० डॉलरवर येऊ शकतो. म्हणूनच भारतीय व्यापारी सोने खाली येण्याचा अंदाज लावत आहेत.

सोन्याचा नवीन भाव
दिली सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. ९९.९ टक्क्याच्या १० ग्राम सोन्याचा भाव ५२, १०४ रुपयांवरून ५२,३९१ वर आला आहे. या दरम्यान किंमतीत २८७ रुपये प्रति १० ग्रामने वाढ झाली आहे.

चांदीचा नवीन भाव
चांदीच्या भावातही चौथ्या दिवशी वाढ झाली. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा भाव ६९,०७५ रुपये प्रति १० ग्रामने ६९,९५० रुपये प्रति १० ग्रामवर आला. या दरम्यान किंमतीत ८७५ रुपये वाढ झाली आहे.

भारतात सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून अल्प श्रेणीत अडकला आहे. मागील सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.०७ टक्क्यांनी वाढला होता, तर चांदी ०.१२ टक्क्याने घसरली होती. सोने मागील महिन्यात ५६,२०० च्या विक्रमी उच्च पातळीवरून सुमारे ५,००० रुपये प्रति १० ग्राम खाली आले आहे. त्याचप्रमाणे चांदीचा भाव सध्याच्या पातळीवरून १०,००० रुपये डॉलर प्रति किलोग्रामपर्यंत खाली आला आहे.