सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, भारतात आज दर 50 हजाराच्या खाली येण्याची अपेक्षा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सोन्याच्या किंमतीमध्ये घसरणीचा कल लागोपाठ तिसर्‍या दिवशी जारी आहे. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे परदेशी बाजारात सोन्याचे दर 2 टक्केने घसरून 1862 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. तर, स्थानिक बाजारात मागील महिन्यात विक्रमी 6000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे. 7 ऑगस्टला एमसीएक्सवर सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पुढे गेले होते. तर, सराफा बाजारात दर 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर पोहचले होते. आता तो 51 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. यानुसार 99.9 टक्के शुद्धा सोन्याचे दर 5000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत कमी झाले आहेत.

आज काय होणार
एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, स्थानिक बाजारात सुद्धा किंमती अंतरराष्ट्रीय स्तरावर आलेल्या तेजीमुळे वाढल्या होत्या. म्हणून या घसरणीनंतर किंमतीमध्ये नरमाईचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. आज सुद्धा सोन्याच्या किंमतीत घसरण होऊ शकते. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 614 रुपये घसरून 50,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला.

कारण अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी होते. मागील ट्रेडमध्ये सोने 51,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, चांदीची किंमत सुद्धा 1898 रुपयांनी घसरून 59,720 रुपये प्रति किलोग्रामवर आली. यापूर्वीच्या ट्रेंडमध्ये चांदी 61,618 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.

सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरणीचे सत्र सूरू आहे. बुधवारी कमोडिटी बाजारात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत चारपट घसरण झाली. जेथे सोने 683 रुपये स्वस्त झाले आहे, तर चांदी 2800 रूपयांनी खाली आली आहे.

का होत आहे सोन्यात घसरण
कोरोना व्हायरसची दूसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणुकदार डॉलरकडे सेफ हेवन म्हणून पहात आहेत. तसेच डॉलर मजबूत होत असल्याने सोन्याच्या किमतीमध्ये घसरण सुरू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like