चांदीत पुन्हा 1500 रुपयांची तर सोन्यात 500 रुपयांची घसरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात २३०० रूपयांपेक्षा अधिक तर चांदीच्या दरात ६१०० रूपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी कामकाजादरम्यान चांदीच्या दरात १५०० रुपयांची तर सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण दिसून आली. कामकाजाच्या सुरूवातील एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यात देण्यात वितरीत करण्यात येणारं सोनं १८१ रुपयांच्या घसरणीसह ४८,७८६ रुपये प्रति १० ग्रामच्या दरावर खुलं झालं. सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरानं ४८,६३५ रुपयांचा किमान आणि ४८,८२७ रुपयांचा कमाल स्तर गाठला होता.

जागतिक बाजारपेठेत झालेल्या सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम शुक्रवारीही भारतीय बाजारपेठेवरही जाणवला. एमसीएक्सवर फेब्रुवारी महिन्यातील वायदा दरात ४ टक्क्यांची म्हणजेच २,०५० रूपयांची घसरण होऊन दर ४८,८१८ रूपये प्रति १० ग्राम इतके झाले होते. तर चांदीच्या दरातही ६,१०० रूपयांची म्हणजे ८.८ टक्क्यांची मोठी घसरण होऊन ते ६३,८५० रूपये प्रति किलोवर पोहोचले. जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात ४ टक्क्यांची घट होऊन ते १,८३३.८३ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले होते. अमेरिकन डॉलरचं वाढलेलं मूल्य आणि बॉन्ड यील्डमधील तेजीमुळे सोनच्या दरात घरसण झाल्याचं म्हटलं जात आहे.

अमेरिकन सीनेटवरील डेमोक्रेडच्या नियंत्रणानं मोठ्या प्रोत्साहनपर उपाययोजनांची शक्यता वाढली आहे. तसंच बॉन्ड यील्डही मार्च महिन्यापासून आपल्या १० वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. शुक्रवारी अमेरिकेत सोन्याचे दर हे १,९०० डॉलर्स प्रति औंसरपेक्षाही अधिक घसरल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारपेठत अमेरिकन डॉलरचं मूल्य वधारलं असलं तरी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. बॉन्ड यील्डमधील तेजी आणि जागतिक बाजारपेठेत असलेल्या तेजीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं म्हटलं जात आहे. कॉमेक्सवर सोन्याचे दर १८२५ डॉलर्सच्या जवळ आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली.