Gold Prices Today | सोने दोन महिन्यात सर्वात स्वस्त, चांदीत सुद्धा मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Prices Today | कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहाराच्या सुरुवातीला सोन्याचा भाव (Gold Price Today) आज 0.71 टक्क्यांनी घसरून दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही 1.64 टक्क्यांनी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आज 0.3 टक्क्यांनी घसरून 6 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. (Gold Prices Today)

 

आजचा सोन्याचा दर (Gold Prices Today)

एमसीएक्सवर, 24-कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 10:40 वाजता 358 रुपयांनी घसरून 50,056 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. सोन्याचा व्यवहार आज 50,202 रुपयांपासून सुरू झाला. दर खुला झाल्यानंतर, एकदा वाढ झाली आणि दर 50,245 रुपये झाला. पण लवकरच त्यात घसरण झाली आणि दर 50,056 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. (Gold Prices Today)

 

चांदी 861 रुपयांनी घसरली (Silver Prices Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीच्या दरातही घसरण झाली. चांदीचा दर आज 861 रुपयांनी घसरला असून भाव 51,700 रुपये किलोवर पोहोचला आहे. आज चांदीचा व्यवहार 51,600 रुपयांनी सुरू झाला. थोड्याच वेळात, भाव 100 रुपये प्रति किलोने सुधारला आणि 51,700 रुपये झाला.

 

आंतरराष्ट्रीय बाजारातही भाव घसरला

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा दर 0.27 टक्क्यांनी घसरून 1703.89 डॉलर प्रति औंस झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा स्पॉट रेटही आज 0.98 टक्क्यांनी घसरला असून तो 17.74 डॉलर प्रति औंसवर आला आहे. सोन्या-चांदीच्या जागतिक किमतीत घसरण होण्याचे मुख्य कारण अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आणि यील्ड बाँडमध्ये झालेली वाढ असल्याचे मानले जाते.

 

अद्याप नाही तेजीची अपेक्षा

लाइव्ह मिंटमधील एका रिपोर्टनुसार, रवींद्र राव, व्हीपी – हेड कमोडिटी रिसर्च, कोटक सिक्युरिटी यांचे म्हणणे आहे की,
आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 6 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे.
याचे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची मजबूती आणि यील्ड बाँडमध्ये झालेली वाढ,
तसेच चिनी अर्थव्यवस्थेची खराब स्थिती यामुळे देखील सोन्याच्या किमतीवर दबाव येत आहे.
राव यांचे म्हणणे आहे की जोपर्यंत अमेरिकन डॉलर आणि यील्ड बाँडमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमतीतील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title :-  Gold Prices Today | fall to near lowest in 2 months silver down at multi year low

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा