Gold Price Today : सोन्याला येतोय पुन्हा ‘भाव’, तर चांदी 70 हजार पार; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहिला मिळत आहे. त्यानंतर आता मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव काहीसा वाढला आहे. सोन्याचा दर एप्रिलच्या फ्युचर ट्रेड 58.00 रुपयांच्या तेजीसह 46,959 रुपयांवर गेला होता. तर चांदी मार्चच्या फ्युचर ट्रेड 140 रुपयांच्या तेजीसह 70,572 वर गेली आहे.

सध्या सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, चांदीच्या दर पुन्हा एकदा 70 हजार रुपयांजवळ गेला आहे. याशिवाय इंटरनॅशनल मार्केटमध्येही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिकेत सोन्याचा बाजारात 2.15 डॉलरने तेजी दिसून आली आहे. त्यानुसार, 1813.54 प्रतिऔंसच्या रेटवर सोन्याचा दर होता. तर दुसरीकडे चांदीचा व्यापार 0.15 डॉलरच्या घसरणीसह 28.08 डॉलरच्या स्तरावर गेला आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोने-चांदीचा दर काय ?
दिल्ली सराफा बाजारात सोने-चांदीचा दर सोमवारी 278 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यानुसार, राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचा दर 46,013 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात वाढ होऊन हा भाव 68,587 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

पुण्यातील सोने-चांदीचा दर काय ?
– 22 कॅरेट सोने – 44,600 रुपये प्रति 10 ग्रॅम
– 24 कॅरेट सोने – 46,830 रुपये प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 74,400 रुपये प्रति किलो.

आत्तापर्यंत 10 हजार रुपयांनी स्वस्त झालं सोनं
या वर्षी सोने मागील काही महिन्यात 10 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. कोरोना महामारीनंतर सोन्याचा दर 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. दरम्यान, याबाबत अभ्यासकांनी सांगितले, की कोरोनाची लस दिल्यानंतर सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहिला मिळाले.