‘सोनं-चांदी’ पुन्हा ‘महागलं’, जाणून घ्या आजचे ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गुरुवारी दिल्लीत सोनं 43 रुपयांनी महागले. तर चांदी 209 रुपये प्रति किलोग्रॅमनं महागली. तज्ज्ञांच्या मते सोन्यात घसरण झाल्यानंतर अनेक मोठ्या शहरांत सोन्याची मागणी वाढली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

सोन्याचे दर –
आज (गुरुवार) सोन्याचे दर 40,458 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, आज सोनं 43 रुपयांने महागले. बुधवारी दिल्लीत सोनं 40,441 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात तेजी आली आहे. सोनं 1,553 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.87 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली आहे.

चांदीचे दर –
आज (गुरुवार) चांदी 47,406 रुपयांवर पोहचली, चांदीच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ झाली. बुधवारी एक किलो ग्रॅम चांदी 47,272 रुपये झाली होती.

का वाढत आहेत सोन्या चांदीचे दर –
एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनिअर अ‍ॅनालिस्ट तपन पटेल म्हणाले की, मकर संक्रातीनंतर स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

यामुळे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे दर –
1) बाजारात तुम्ही ज्या किंमतीने सोने खरेदी करता त्या दराला हाजिर भाव म्हणतात. अनेक शहरात सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजारात भाव ठरवतात.

2) एमसीएक्स वायदा बाजारात जो दर येतो, त्याला व्हॅट, लेव्ही आणि घडवण यांचे दर जोडून घोषित केले जातात.

3) तेच दर दिवसभर सुरु राहतात. विविध शहरात सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. याशिवाय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती शुद्धतेच्या आधारे निश्चित केल्या जातात. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे असतात.

4) MCX वर कसे निश्चित होतात दर – मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) भारतीय बाजारात सोन्याच्या मागणी आणि पुरवठा ही माहिती जमा करुन ग्लोबल मार्केटमध्ये मुद्रास्फीतीची स्थिती पाहून सोन्याच्या किंमती निश्चित करतात.

5) तसेच, संघटनेचा लंडन बुलियन मार्केट असोसिएशनबरोबर समन्वय असतो त्याद्वारे सोन्याच्या किंमती निश्चित होतात. वायदा बाजाराचे भाव संपूर्ण देशात एक सारखे असतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/