‘या’ कारणामुळं आज पुन्हा महागलं ‘सोनं-चांदी’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडल्याने देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी महागली आहे. सोनं आज 112 रुपयांनी महागले. चांदीच्या किंमतीत तेजी आल्याने चांदी 94 रुपयांनी महागली. मंगळवारी आणि बुधवारी सोन्यांच्या किंमतीत 350 रुपयांपेक्षा जास्त घसरणं आली होती. या दरम्यान सोनं 784 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले होते.

सोन्याचे दर –
दिल्ली सराफ बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोनं 41,137 रुपयांवरुन 41,249 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज सोनं 112 रुपयांनी महागले. गुरुवारी सोन्याच्या किंमती 41,019 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,556.7 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 17.79 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली. औद्योगिक मागणी वाढल्याने शुक्रवारी दिल्लीत चांदी 94 रुपयांनी महागली. आज चांदी 47,305 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.

अशी करा सोन्याच्या खऱ्या-खोट्या दागिण्यांची पारख –
1. सोन्याचे दागिणे खरेदी करताना बीआयएस हॉलमार्क आवश्य पाहा. बीएसआय मार्क म्हणजे शुद्ध सोने. याबरोबर तुम्हाला हे देखील पाहावे लागेल की बीएसआय मार्क खरे आहे की खोटे. बीएसआय हॉलमार्कचे चिन्ह प्रत्येक दागिण्यावर असते त्याबरोबरच एक त्रिकोणी चिन्ह असते, यासह भारतीय मान ब्युरोच्या चिन्हासह सोन्याची शुद्धता लिहिलेली असते.

2. यावरुन काही सेकंदात लक्षात येते की सोने खरे आहे की खोटे. ही चाचणी तुम्ही घरी देखील करु शकतात. यासाठी सोन्याला पिणेने एका जागेवर घासा त्यावर नायट्रिक अॅसिडचे काही थेंब टाका. सोन्याचा रंग बदलला नाही तर सोनं शुद्ध, परंतु सोनं हिरवं झालं तर सोनं खोटं आहे.

3. खऱ्या सोन्याची ओळख लोहचुंबक वापरुन देखील केली जाते. एक स्ट्रॉंग चुंबक घ्या आणि तो सोन्याच्या बाजूला ठेवा, सोनं त्याकडे आकर्षित झाले तर सोन्यात इतर धातूंची मिलावट आहे असे समजावे. परंतु तसे झाले नाही तर सोनं शुद्ध समजावे.

4. पाण्याच्या माध्यमातून देखील तुम्ही सोन्याची चाचणी घेऊ शकतात. सोन्याला बादलीभर पाण्यात बुडवा, जर सोनं बुडलं तर सोनं खरं आहे आणि सोनं काही वेळ पाण्यावर तरंगलं तर सोनं खोटं आहे असं समजावं. सोनं कितीही हलकं असेल, कितीही कमी प्रमाणात असो, ते पाण्यात बुडते.

5. जर तुम्हाला माहित नसेल की कॉमन बुलियन शिक्के कसे दिसतात आणि शुद्ध सोन्यांची ओळख कशी करायची तर तुम्ही कायम विश्वसनीय सराफाच्या दुकानात जावे. तसेच मोठ्या शोरुमवर देखील विश्वास दर्शवला जाऊ शकतो कारण ते तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेचे दस्तावेज देतील.